पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांनी 8 जानेवारी 2026 ला वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डॉ. गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. डॉ. माधव गाडगीळ हे भारतातील पर्यावरणशास्त्राच्या क्षेत्रातील एक अत्यंत महत्वाचे नाव होते. पश्चिम घाटातील जैवविविधता, निसर्गसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि स्थानिक समुदायांच्या सहभागावर आधारित विकासाचा त्यांनी आग्रह धरला. पश्चिम घाट विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या गाडगीळ समितीच्या अहवालामुळे देशभरात मोठी चर्चा झाली होती. डॉ. माधवराव गाडगीळ यांना केंद्र शासनाकडून ‘पद्मश्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांनी वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
RELATED ARTICLES

