कुख्यात गुंड गजा मारणे याला 15 व 16 तारखेला मतदानासाठी पुण्यात येण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून उमेदवार असून त्या पुण्यातील प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवत आहेत.
यापूर्वी पुणे पोलिसांनी गजा मारणेला शहरात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. मात्र पत्नी निवडणुकीच्या रिंगणात असल्याने, त्याला मतदानाचा हक्क बजावता यावा, या कारणांवरून न्यायालयाने ठराविक कालावधीसाठी त्याला पुण्यात येण्याची परवानगी दिली आहे.


