Saturday, January 17, 2026
23.6 C
Pune
Saturday, January 17, 2026
spot_img
Homeराजकारणमहायुतीतील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

महायुतीतील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, “घटक पक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षात घेऊ नये, असे आधीच ठरले आहे. तरीही कोणी सुरुवात केली, तर आम्हीही गप्प बसणार नाही.”

पक्षबदलांमुळे मतांची विभागणी होऊन अधिकृत उमेदवारांचे नुकसान होऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर समन्वयाचे संकेतही अजित पवार यांनी दिले आहेत. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला त्यामुळे पुन्हा वेग आला आहे.

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच नवे प्रवेश होणार असल्याचे संकेत देत, राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular