फळांचा स्टॉल लावून संसार चालवणाऱ्या भाग्यश्री महादेव जगताप यांनी लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या त्या उमेदवार होत्या.
अनेक वर्षे उन्हातान्हात पेरू विकून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या भाग्यश्री ताईंनी सकाळी प्रचारापूर्वी स्टॉल लावला आणि संध्याकाळी मतदारांशी संवाद साधला. निवडणुकीनंतरही त्यांनी स्टॉल लावणे सुरू ठेवले असून, “मेहनतीचं काम कधी लहान नसतं” असा संदेश दिला आहे.
आदिवासी पट्ट्यातील बॅटरी हिल परिसरातील रहिवासी असलेल्या भाग्यश्री यांचा हा संघर्ष आणि स्वाभिमानाचा प्रवास अनेक महिलांना प्रेरणा देत आहे. लोणावळ्यात राष्ट्रवादीचा एकूण दबदबा असताना त्यांचा विजय कौतुकास्पद

